
कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असून या प्रश्नावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने विविध मागण्या यात मांडल्या आहेत.
अंबाबाईची घागरा-चोली रुपात पूजा बांधल्यानंतर सुरू झालेला वाद आता ‘पुजारी हटाओ’ मोहिमेपर्यंत पोहचला आहे. पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमावेत,अंबाबाई ची पूजा महिलांनी करावी,महिला गाभारा प्रवेश,अश्या मागण्या समितीने केल्या आहेत.
अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा अपमान करणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात सर्व पक्ष, संघटना आणि सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. उद्याच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply