कोल्हापूर स्पोर्टस् क्लबच्यावतीने ऑलंपिकमधिल ट्रायथलॉन व ड्युएथलॉन स्पर्धांचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी कोल्हपुरात

 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला व्यापक आयाम देणा-या ट्रायथलॉन व ड्युएथलॉन या ऑलंपिक मधे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांचे आयोजन २९ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबने कोल्हपुरात केले असल्याची माहिती अध्यक्ष चेतन चव्हाण आणि सचिव उदय पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, स्विमिंग, सायकलींग, रनिंग यांचा समावेश असणा-या ट्रायथलॉन आणि रनिंग सायकलींग रनींगचा समावेश असलेल्या ड्युएथलॉन स्पर्धा प्रत्येकी तीन गटात होणार आहेत. www.kolhapursportsclub.com या वेबसाईटवर ट्रायथलॉन व ड्युएथलॉन स्पर्धांच्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. या स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. या आधी हैद्राबाद, दिल्ली आणि चेन्नई येथे अश्या स्पर्धा भरविल्या आहेत.यातून ऑलंपिकसाठी चांगले खेळाडू तयार होतील. भारतात खुप कमी ठिकाणी या स्पर्धा होत आहेत.कोल्हापुरला हा मान मिळत आहे.
या स्पर्धेसाठी राजारामपुरी तेराव्या गल्लीतील ई-जी-१ अपूर्वा टॉवर येथे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी केएससीचे उपाध्यक्ष डॉ. विजय कुलकर्णी, आशिष तंबाके, एस.आर.पाटील, डॉ. प्रदीप पाटील, गोरख माळी, वैभव बेळगांवकर, डॉ. संदेश बागडी, आदित्य शिंदे, महेश शेळके, नगरसेवक राहूल माने आदी कार्यरत आहेत. समन्वयक आणि तांत्रिक मार्गदर्शक म्हणून वैभव बेळगांवकर (मो. ८३९०२८८८५७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले.सहभागीना विशेष प्रशिक्षण देण्याची सोय आहे.या स्पर्धांना राज्य क्रीडा विभागाची मान्यता आहे. तरी खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पोर्ट्स क्लब ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!