

आता पर्यंत हृदयरोगतज्ञ बेअर मेटल स्टेंट्स किंवा ड्रग इल्युटिंग स्टेंट्स वापरत होते परंतु टार्गेट एल्युटिंग स्टेंट (टीईएस) रुग्णांसाठी चांगला पर्याय म्हणुन निवडला जात आहे. संपूर्ण जगभरातील हृदयरोगतज्ज्ञ, टार्गेट एलिटिंग स्टेंट (टीईएस) ची प्रशंसा करतात. ह्याच्या योग्यरित्या करण्यात आलेली डिजाईन रुग्णांची काळजी घेण्यास आणि त्यांना लवकर बरे करण्यास सक्षम आहे.
यशस्वी वैद्यकीय चाचण्यांचा अभ्यास करणारे अमेरिकेतील डॉ. मार्टिन लिऑन, युरोपीसीआर (पॅारीस कोर्स अॅाफ रिव्हॅास्कुलाईझेशन) यांनी अलीकडेच 2017 मध्ये पॅरीस कार्डिऑलॉजी रोड शोमध्ये असा निष्कर्ष काढला आहे की, टीईएसचे निर्माण करणारी फ़ायरहॉक कंपनीच्या टारगेट क्लिनीकल ट्रायल्समध्ये असे अढळुण आले की, टीएलआर दर लक्षणीयरीत्या कमी करण्यात रक्त गोठण्यासारख्या समस्येवर हे तंत्रज्ञान खुप प्रभावशाली ठरत आहे. अशी माहिती माइक्रोपोर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रियाझ देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
युरोपमधील डॉ. विल्यम विजेन्स यांनी 3 महिने ओसीटीच्या सर्व टारगेटच्या डेटाचा पाठपुरावा केला आणि फ़ायर हॉकच्या आकाराचा अभ्यास केला आहे.
रियाझ देसाई म्हणतात की, “आम्ही आमच्या भारतीय कार्यकरणीची सुरूवात 7 महिन्यापूर्वी केली आहे, कोल्हापूरमध्ये टीईएस तंत्रज्ञानास घेऊन येताना खुप उत्साही आहोत. भारतात आम्ही आणलेल्या तंत्रज्ञानाबाबत आम्ही अतिशय आनंदी आहोत. टार्गेट एल्युटिंग स्टेंट (टीईएस) ला २६हून अधिक देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे. टीईएसमध्ये वापरले जाणारे आधुनिक रोबोटिक लेझर कट आणि ३ डी प्रिंटिंग साऱखे तंत्रज्ञान खुप फायदेशीर आहे. ह्या आधुनिक नवकल्पना आणि तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील लोकांना ह्याचा निश्चीत फायदा होईल. हळूहळू भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा प्रभाव जाणवेल.भारतात ह्याची सर्वव्याप्ती वाढत आहे. आतापर्यंत भारतातील 54 हून अधिक रुग्णालयात फायरहॉकला मंजुरी मिळाली आहे.कोल्हापुरातील सर्व हार्ट हॉस्पिटलमधे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे असेही देसाई यांनी सांगितले.
Leave a Reply