
कोल्हापूर : डेंग्यु, मलेरिया व चिकनगुनिया या साथ रोगांचा फैलाव रोखणे करिता आरोग्य व किटनाशक विभागामार्फत करण्यात आलेल्या टायर जप्ती मोहिमेमध्ये 500 हून अधीक टायर्स जप्त करण्यात आल्या. दि. 22 व 23 जुन 2017 रोजी खानविलकर पेट्रोल पंप, महावीर कॉलेज, रमणमळा, भगतसिंग वसाहत, मातंग वसाहत, माळ गल्ली, कसबा बावडा, कपिलतीर्थ मार्केट, गंगावेश, शोलेनगर, टिंबर मार्केट, संभाजीनगर पेट्रोल पंप, सुधाकर जोशी नगर, 690 कामगार चाळ, वारे वसाहत, गवत मंडई, यादवनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, वर्षानगर या परिसरामध्ये कारवाई करुन लहान- मोठ्या अशा 500 हून अधिक टायर्स जप्त करण्यात आल्या.
सदरची कारवाई आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या मागदर्शनाखाली किटनाशक अधिकारी अिʉानकुमार डांमरे, आरोग्यनिरीक्षक स्वप्नील उलपे, निखिल पाडळकर, मुकादम व कर्मचारी यांनी केली.
नागरीकांनी आपल्या आसपास असणाऱ्या खराब टायर्स ज्यामध्ये पाणी साचून डासांची पैदास होईल अशा अनावश्यक वस्तुंची त्वरित विल्हेवाट लावावी. अन्यथा अशा टायर जप्त करुन दंडात्मक कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
Leave a Reply