
सासु-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधीठरली ती ‘स्टार प्रवाह’ची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातअफाट लोकप्रियता लाभलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टारप्रवाहची सर्वाधिक काळ चाललेली, प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही मालिका संपणार आहे.त्यामुळे अवघा महाराष्ट्र आक्कासाहेबांच्या करारी व्यक्तिमत्त्वाला मुकणार आहे. मालिकांची चाकोरी मोडून सासू-सुनेचं वेगळ्या प्रकारे उलगडलेलं नातं हे ‘पुढचं पाऊल’चंवेगळेपण. या मालिकेतील आक्कासाहेब आपल्या सुनांच्या पाठीशी कायमच खंबीरपणेउभ्या राहिल्या. मग तो पुनर्विवाह असो, शिक्षण असो किंवा नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं…आक्कासाहेबांनी कायमच सुनांचं समर्थन केलं. वेळप्रसंगी त्यांनी विरोधही पत्करला. तसंचगावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्या धावूनही गेल्या. काळाच्या पुढचा विचार यामालिकेतून मांडण्यात आला. म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. प्रेक्षकांनी केवळ मालिकेवर प्रेम केलं असं नाही, तर आक्कासाहेब या व्यक्तिरेखेला रोजच्याआयुष्यातही स्वीकारलं. मग ते ठसठशीत कुंकू-टिकली लावणं असेल, साडी नेसणं असेल,दागिने घालणं असेल किंवा त्यांच्यासारखं स्पष्ट बोलणं ठिकठिकाणी दिसू लागलं.अक्कासाहेबांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्याच जोरावर ही व्यक्तिरेखाआयकॉनिक आणि लार्जर दॅन लाईफ ठरली. पुढचं पाऊल’ ही ‘स्टार प्रवाह’ची सर्वाधिक काळ चाललेली मालिका. जवळपास दोनहजार भाग आणि सहा वर्षांचा टप्पा गाठलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून स्टार प्रवाहनंसकारात्मक आणि नवा विचार दिला. मालिकेचा ‘गुड बाय एपिसोड’ येत्या शनिवारी १ जुलैरोजी संध्या ६.३० वाजता प्रेक्षकांना बघता येईल. ही मालिका आता संपणार असली, तरीहाच विचार मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्या मालिका, कार्यक्रमांतून नवा विचारकायमच स्टार प्रवाहकडून दिला जाईल.
Leave a Reply