
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव आंदोलनातील प्रमुख तीन आंदोलकांना ठार मारण्याची धमकी देणारी पत्रे आले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून आज सकाळी शिवाजी चौकात जिल्हयातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने मिळून या धमकी पत्रांची होळी करून तीव्र निषेध केला.
‘तुमची नाटकं बंद करा, नाहीतर तुमचा दाभोलकर करू’ असे वाक्य असलेले निनावी धमकी पत्र २३ जून रोजी आंदोलनकर्ते दिलीप पाटील, दिलीप देसाई, सचिन तोडकर यांना आले होते. या अशा निनावी पत्रांना आम्ही घाबरणार नाही असे मत आज आंदोलनकर्ते दिलीप देसाई यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर एका समाजाची संघटना असा उल्लेख करीत स्वतःला पदाधिकारी समजणाऱ्या विश्वजित देशपांडे आणि आनंद दवे या माणसांनी काल पुण्यामधून एक व्हिडिओ प्रसारित करून या प्रकरणी जातीय तेढ निर्माण केली असून त्या’चाही यावेळी निषेध करण्यात आला.
या वेळी माजी महापौर आर.के. पोवार,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, दिलीप पाटील, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, अॅड. चारुलता चव्हाण, वैशाली महाडिक, डॉ. सुभाष देसाई, सुनीता पाटील, स्मिता हराळे, सुनंदा चव्हाण, रोहिणी लाड, आंदोलनकर्ते उपस्थित होते
Leave a Reply