
कोल्हापूर : श्री पूजक म्हणवणारे मुनीश्वर यांच्यासह इतर पुजाऱ्यानी मंदिरात सुमारे ६ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. हे सार्वजनिक पैशाचा अपहार करणारे लुटारू आहेत. त्यांची ईडीने चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉ. सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री अंबाबाई मंदिर हे छत्रपतींच्या मालकीचे देवस्थान असून रामचंद्र भट प्रधान यांच्याकडे देवस्थानची व्यवस्था सोपवली होती. त्यांचे नातू भालचंद्र प्रधान हे १९५४ साली आपल्या आईचे थोरले काका श्रीपाद प्रधान यांना दत्तक गेले. दत्तक विधानावेळी वडील ८५ वर्ष तासेच भालचंद्र ७ वर्षांचे होते. वडील वारल्यानंतर भालचंद्र अज्ञान असल्याने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ञान झाल्यावर देवस्थान परत त्यांच्या ताब्यात करेन असे आश्वासन देऊन देवस्थान आपल्या नावावर केले. त्यानंतर आजपर्यंत ते मंदिर श्री पुजाकांच्या ताब्यात आहे.
मुनीश्वरांनी ताबा घेतल्यानंतर त्यांनी मंदिरात गैरव्यवहार सुरु केला. नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक देवी दर्शनास येतात. त्यांनी दानपेटीत टाकलेल्या पैशांना तसेच देवीला दिलेली साडी आणि दागिन्यांची विक्री केली आहे. सार्वजनिक पैशांचा अपहार करणारे श्री पूजक हे लुटारू आहेत. धर्माच्या नावाखाली त्यांनी ६ हजार कोटींचा अपहार केला आहे. असे आरोप करत या श्रीपूजकांच्या मालमत्तेवर धाड टाकावी आणि मंदिराचा ताबा शासनाने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
Leave a Reply