
कोल्हापुर :कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी रवाना होणाऱ्या हज यात्रेकरुंना मेनीनजायटीस लस (उष्णता प्रतिरोधक ) आणि पोलिओ डोस लसीकरण शिबिर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील ऑडीटोरियम हॉल आज सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्हा शल्य चिकित्सक एल.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.या शिबिरात एकूण ४१९ स्री-पुरुष हज यात्रेकरूना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मेनिनजायटीस ही उष्णता प्रतिरोधक लस आणि पोलिओ लस देण्यात आली.यावेळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील २८ कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते.
यावेळी प्रमिलाराजे रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी डी.डी.शिर्के,डॉ.थोरात,डॉ.कुर्ले,डॉ.पॉल,डॉ.पालेकर,डॉ.व्ही.एस.पाटील यांच्यासह हज फौंडेशन,कोल्हापूरचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर,उपाध्यक्ष बालेचांद म्हालदार,सचिव समीर मुजावर,खजानिस हाजी बाबासाहेब शेख,यांच्यासह अस्लम मोमीन,सादत पठाण,यासीन उस्ताद,नूर मुजावर मुबारक मुल्ला अनिस बेपारी,सोहेल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातून यंदा जवळपास सेन्ट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आणि खासगी टूर्स आयोजकांच्यावतीने जवळपास ५०० हज यात्रेकरू या यात्रेस रवाना होणार आहेत.या यात्रेदरम्यान सौदी अरेबिया येथे उष्णतेचा कोणताही त्रास यात्रेकरूंना होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगटातील स्री-पुरुष हज यात्रेकरूना आज ही लस देण्यात आली.यामध्ये राज्य हज कमिटीच्या वतीने जाणारे एकूण १२३ पुरुष यात्रेकरू आणि ११८ महिला यात्रेकरू तसेच खासगी टूर्स आयोजकांच्या वतीने जाणारे ६० पुरुष आणि ८७ महिला यात्रेकरूना हे लसीकरण करण्यात आले.
यानंतर ७० वर्षावरील हज यात्रेकरूना ऐच्छिक स्वाईन फ्लू लसीकरण करण्यात येणार असून त्यावेळी उर्वरित ज्यांनी मेनिनजायटीस ही उष्णता प्रतिरोधक लस आणि पोलिओ लस घेतलेली नाही अशांना पुन्हा ही लस देण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख जाहीर केली जाईल असे जिल्हा शल्य चिकित्सक एल.एस.पाटील यांनी सांगितले
Leave a Reply