
कोल्हापूर : कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यासंदर्भातील अडचणीबाबत बैठक समिती कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान तात्काळ खात्यात जमा व्हावे, नवीन बँक खात्याचे फॉर्म बँकेने स्वतःमार्फत शुन्य शिल्लक वर खाते उघडावे. लाभार्थ्यांना सहानभुतीपूर्वक वागणूक द्यावी, तसेच लाभार्थ्यांना अनुदान वितरणासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. तसेच अनुदानामधील काही रक्कम मुदत ठेव करण्यात येऊ नये, हयातीचे दाखले बँकेने स्विकारावेत अशा मागण्या केल्या. तसेच हे प्रश्न समिती, बँक प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राजारामपुरी शाखेचे रविंद्र साळोखे यांनी लाभार्थ्यांची यादी वेळेवर मिळावी व पेमेंट यंत्रणा अॉनलाईन पद्धतीने करावी अशी सुचना केली. बँकेचे शाखाधीकारी सौ.स्वामी, प्रताप साळोखे, एस एस पाटील यांनी विविध सूचना केल्या. प्रशासकीय लेखापाल मदन घुगे यांनी लाभार्थ्यांचे अनुदान सुरळीत वितरण होण्यासाठी बँकेवरील ताण कमी होणेसाठी दर महिन्याच्या १६ ते ३१ तारखेपर्यंत बँकेतून मिळेल असे सांगितले. समिती सदस्य सागर घोरपडे यांनी बँक खात्यासाठी आधारकार्ड व पँनकार्डची झेरॉक्स आवश्यक असून, जे लाभार्थी अपंग अथवा वृद्धापकाळामुळे बँकेत येऊ शकत नाहीत त्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे कोणताही त्रास न होता अनुदान द्यावे अशी मागणी केली. यावेळी प्रशासन, समिती व बँकेच्या माध्यमातून लाभार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन ही योजना जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत अशोक लोहार, पूजा भोर यांनी भाग घेतला. शुभांगी भोसले यांनी स्वागत केले, तर दिग्विजय कालेकर उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शहर समितीचे सर्व सदस्य, कार्यालयीन कर्मचारी प्रसाद वडणेरकर, प्रितम हिंगमीरे तसेच केडीसीसीच्या शहरातील सर्व ११ शाखांचे शाखाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply