
कणेरी : भल्या पहाटेच्या काकडारतीपासून रात्री प्रवचनापर्येंत सिद्धगिरी मठावर गुरुपौर्णिमेनिमित्त पंचकोरशीतून आलेल्या भक्तांचा महासागर लोटला होता. महाराष्ट्रातील विवीध जिल्ह्यासह कर्नाटक, गोवा तसेच भारतातून आलेल्या लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सिद्धगिरी मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी व उत्तराधिकारी मठाधिपती पूज्य मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी तब्बल ३ किमी पर्येंत रांग लावली होती.

व्यक्तिगत, कौटुंबिक आणि आयुर्वेदिक अशा सिद्धगिरी उत्पादनाच्या वितरणास आजपासून प्रारंभ झाला. नितेश दाभोलकर आणि उदय सावंत यांनी या उत्पादनांची पावरपॉईंट द्वारे माहिती दिली. सिद्धगिरीच्या लौकिकास साजेशी आणि शुद्धता, शक्ती व सिद्धता या त्रिसूत्रीवर उत्पादित हि उत्पादने सर्वानाच नक्कीच आवडतील अशा शब्दात स्वामीजींनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. रात्री गुरु शिष्य परंपरा आणि शिष्याच्या निरपेक्ष आणि निर्मळ भक्तीचे महत्व आपल्या हितगुजपर प्रवचनात स्वामीजींनी सांगितले. प्रवचनानंतर हि भाविकांची दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
Leave a Reply