कोल्हापूर :येत्या शनिवारी दिनांक २२ व २३ जुलै रोजी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावरती नि:शुल्क व रहिवाशी सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित केलेली आहे
पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषि अनुषंदान परिषद नवी दिल्ली अंतर्गत सिद्धगिरी मठ हे केंद्र सरकार मार्फत सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण केंद्र निवड झालेले आहे. त्याच्या वतीने हि मोफत कार्यशाळा संपन्न होत आहे. या सेंद्रिय शेती कार्यशाळेत डॉ. एल नारायण रेड्डी – बेंगलोर (आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती तज्ञ्),मा. श्री अरुण पाटील – खेबवडे (आदर्श गोपालक), श्री एम. आर. चौगुले – (शाहू नैसगिर्क शेती मंडळ – कोल्हापूर), मा. श्री मारुतराव साळोखे (गो आधारित सेंद्रिय शेती तज्ञ्), श्री अशोकराव इंगवले – बीडला -सर्वोत्कृष्ट खिल्लार गोपालक, श्री. अशोकराव पिसाळ – विस्तार विद्या प्रमुख – कृषी महाविद्यालय- कोल्हापूर ,श्री. डॉ. नितीन मार्केडेयसर देशी गोवंश वंशावळ तस – परभणी कृषी विद्यापीठ आदी दिगज्ज मार्गदर्शन करणार आहोत या कार्यशाळेत प पू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचीही प्रेरक उपस्थिती असणार आहे
प्रामुख्याने सेंद्रिय नंतर- स्फुरद पालाश सुक्ष्म अन्नद्रव्ये कीटकनाशके व पिकवाढीच्या अनुभव सिद्ध पद्धती विविध प्रयोग सिद्ध शेतकरी स्वतः शिकवणार आहेत या प्रशिक्षणासाठी येताना आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी आणि २ पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन यावेत सहभागी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीं संशोधक याना मागणी नुसार सहभागी प्रमाण पत्र दिले जाणार आहेत तरी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. त्यासाठी थेट कणेरी मठावर तसेच ९८५०९३५२९३ या फोन वर संपर्क साधावा. असे आवहान , संयोजक सिद्धगिरी सेंद्रिय शेती विभाग कणेरी मठ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Leave a Reply