
कोल्हापूर : नवीन वस्तू व सेवा करकायद्यांतर्गत TDS कपातीसाठी शासकीय कार्यालयांना वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणी घ्यावी लागणार आहे.सदर नोंदणीची सुविधा दिनांक 20 जुलै 2017 पासून GSTN पोर्टलवर सुरु होणार आहे
आज दि. 18 जुलै 2017 रोजी येथील वस्तू व सेवा कर विभागीय कार्यालयात दुपारी 12 ते 03 या कालावधीत वस्तू व सेवा कर कायद्यातील TDS या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयातील सुमारे 250 आहरण व संवित्रण अधिका-यांनी (D.D.O) उपस्थिती दर्शविली.
नवीन वस्तू व सेवा करकायद्यांतर्गत TDS कपातीसाठी शासकीय कार्यालयांना वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणी घ्यावी लागणार आहे.सदर नोंदणीची सुविधा दिनांक 20 जुलै 2017 पासून GSTN पोर्टलवर सुरु होणार आहे, तसेच या शासकीय कार्यालयांना विवरणपत्र दाखल करावे लागणार असून तसेच TDS चा भरणा करावा लागणार आहे. यास्तव या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये नोंदणी घेण्याची प्रक्रिया त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, विवरणपत्र दाखल करणे, TDS भरणा करणेतसेच वस्तू व सेवा करकायद्यांतर्गत TDS बाबतीत असणा-या तरतुदी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून सहायक राज्यकर आयुक्त नितीन बांगर, सहायक राज्यकर आयुक्त अभिजीत पोरे तसेच राज्यकर अधिकारी आर. एम.खोत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आहरण व संवित्रण अधिका-यांच्या शंकांचे निरसन करुन सखोल चर्चा केली. तसेच नोंदणी संदर्भात काही अडचणी असल्यास विभागातील मदत कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
Leave a Reply