
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचाखून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. तीस्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशीकुटुंबाचा विश्वास बसलेला नाही.
बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूनं संपवलं.खूनानंतर त्यानं तिला लगेच गाडूनही टाकलं. मैथिली गेल्याची बातमी सूर्यवंशी कुटुंबालाकळल्यानंतर त्यांना धक्का बसला. हा धक्का पचवताना तेराव्या दिवशीच मैथिली सारखीचदिसणारी मुलगी घरात दाखल झाली. आता ही नेमकी कोण, मैथिली की सोनिया असा संभ्रमनिर्माण झाला मात्र, तिनं आपण सोनिया कारखानीस असल्याचे पुरावेही दिले. मात्र, नेहाला तिचं म्हणणंअजिबात पटलेलं नाही. तिच्या वागण्या-बोलण्यातून ती मैथिली असल्याची नेहाची भावना आहे.आता परतलेली खरी कोण आहे, मैथिली की सोनिया असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर तीसोनिया असेल, तर सूर्यवंशी कुटुंबात असं अचानकपणे येण्याचं कारण काय हा प्रश्न आहे. यासाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी न चुकता पहा दुहेरी सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजताफक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply