कोल्हापूर :देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी झालेल्या मतदानानंतर आज संसदेच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीस सुरुवात झाली एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मतमोजणीत सुरुवातीपासूनच पुढे होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिला राष्ट्रपती होण्याचा मान रामनाथ कोविंद यांना मिळाला आहे. याबद्दल आज भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात झालेल्या मिटिंगमध्ये आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
माजी अध्यक्ष महेश जाधव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज या निवडीमुळे संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाची घौडदौड सुरु असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विरोधकांच्या विविध प्रकारच्या आरोप, प्रत्यारोपांनी हि निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी महत्वपूर्ण होती. देशहितासाठी घेतलेल्या तसेच अनेक निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मकता मिळून येताना दिसून येते.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई म्हणाले, देशाच्या सर्वोच्च पदी एका दलित व्यक्तीचा राष्ट्रपती म्हणून सन्मान होणे हि भारतीय जनता पार्टीच्या एकात्मतेचे दर्शन होय. ज्या प्रमाणे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी “सबका साथ ..सबका विकास” या पद्धतीचा नारा देताना जाती-पाती आणि धर्माच्या पलीकडे जावून पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे हे निर्देशक होय.
यावेळी भाजपा कार्यालयात पेठे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, श्री संपतराव पवार, आर.डी.पाटील, सौ भारती जोशी, सौ किशोरी स्वामी, सौ वैशाली पसारे, सौ सुलभा मुजुमदार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply