राजाराम बंधारा पाण्याखाली

 

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसापासून जिल्हयात पावसाची संततधार सुरु असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधा-याची पाणी पातळी 34 फूट 8 इंच इतकी असून पावसामुळे नद्यांवरील 69 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे.

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 34 फूट 8 इंच, सुर्वे 33 फूट 3 इंच, रुई 62 फूट 6 इंच, इचलकरंजी 57 फूट 6 इंच, तेरवाड 52 फूट, शिरोळ 42 फूट, नृसिंहवाडी 40 फूट. इतकी आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, कसबा तारळे व शिरगाव हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कासारी नदीवरील यवलूज,ठाणे -आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, वाळोली, पेंटागळे, कांटा व करंजपेन हे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील शेनवडे, मांडूगंली, वेतवडे, सांगशी हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे, येल्लूर, भोसलेवाडी, वाल्लूर, सुतारवाडी, येळाणे व कोळगाव हे 10 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, निळपण, वाघापूर, बस्तवडे, सुरुपली, शेणगांव, गारगोटी व म्हसवे हे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, साळगांव, गिजवणे व निलजी हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर, भोगोली, हिंडगांव, गवसे, कानडी सावर्डे व अडकूर हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ताम्रपणी नदीवरील चंदगड, कुडतणवाडी, हालारवाडी, कोकरे, नावेली व उमगांव हे 6 नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सुळकुड हे 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर धामणी नदीवरील सुळे, आंबाडे, पनोरे, गवशी व म्हासुर्ली 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.असे जिल्हयातील आज एकूण 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!