
भर पावसात कुल्फी किंवा आईस्क्रीम खाणं म्हणजे क्रेझी अनुभव असतो. हाच क्रेझी अनुभव घेतला स्टार प्रवाहकुटुंबातील सदस्यांनी… वर्ल्ड आईस्क्रीम डे निंमित्त स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी मालिकेच्यासेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. जगभरात नुकताच वर्ल्ड आईस्क्रीम डे साजरा केला गेला. या निमित्ताने स्टार प्रवाहच्या गोठ, लेक माझी लाडकी,दुहेरी, नकुशी या मालिकांच्या सेटवर उत्साहानं आईस्क्रीम सप्ताह साजरा करण्यात आला. अगदी ज्येष्ठ अभिनेत्रीउषा नाडकर्णी, नीलकांती पाटेकर यांच्यापासून ते ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, आशुतोष कुलकर्णी, विकासपाटील, सायली देवधर, संकेत पाठक, सुपर्णा श्याम, समीर परांजपे, रुपल नंद, प्रसिद्धी किशोर, सुप्रिया विनोद,सुशील इनामदार, विवेक गोरे, शलाका पवार, नीलपरी खानवलकर, सिद्धेश्वर झाडबुके, सिद्धेश प्रभाकर, अमृतापवार, आदी कलाकार आईस्क्रीम खाण्यात पुढे होते. या सर्वांनी कुल्फी, कँडीवर ताव मारला.आईस्क्रीम सप्ताह ही संकल्पनाच फार कमाल आहे. पाऊस पडत असताना आईस्क्रीम खाणं जरा विचित्र वाटलं,तरी त्यातही एक वेगळी गंमत आहे. या आईस्क्रीम सप्ताहच्या निमित्तानं ही गंमत आम्हालाही अनुभवता आलीयाचा आनंद वाटतो,’ असं गोठ या मालिकेतील लोकप्रिय जोडी ‘विरा’ अर्थात, समीर परांजपे आणि रुपल नंद यांनीसांगितलं.
Leave a Reply