
कोल्हापूर: अनेक रोगाचे समूळ उच्चटन करण्यासाठी मोठी ताकद असणारी सेंद्रिय शेती कार्यशाळेस आज सिद्धगिरी कणेरी मठ येथे प्रारंभ झाला.आगामी काळात ही शेती भारताचे बलस्थान ठरेल यासाठी अवघे जग मोठ्या अपेक्षेने भारतीय शेतीकडे विश्वासाने पाहत आहे या मार्गदर्शनाचे दायित्व आपल्या शेतीत सेंद्रिय प्रयोग नियमितपणे करून शेतकरी वर्गाने कृतिशीलता दाखवावी असे मनोगत ज्येष्ठ अंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रयोगशील केंद्रीय शेती तज्ञ डॉ.एच.नारायण रेड्डी यांनी व्यक्त केले.कार्यशाळेचा प्रारंभ प.पु.श्री अदृश्य काढसिद्धेश्वर महाराज यांनी गोपूजनाने केला.वाळवी,गांडूळ हे वरदान असल्याचे सांगत आपले निरीक्षण संशोधन पक्के झाले आहे, गांडूळ हा जमिनीचा पोत सुधारण्यात महत्वाची भूमिका पार पाडतो असेही रेड्डी यांनी सांगितले.महाराष्ट्र.गोवा,कर्नाटक येथून हजारोंच्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी सहभागी झाल्या आहेत.समन्वयक तानाजी निकम यांनी आजच्या विचारमंथन,एक एकरात शंभर पिके,सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग पाहणीची शेत शिवार फेरी ही मोठी शेती पंढरीची वारी असल्याचे सांगत सर्वांचे स्वागत केले.केंद्र सरकारच्या पंडित दिन दयाळ उन्नती शेती योजनेची माहिती कृषी विस्तार प्रमुख डॉ.अशोक पिसाळ यांनी दिली,तर अनुवांशिक गो सुधार योजना माहिती डॉ.नितीन मार्केंडेय यांनी दिली.विविध सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन काढसिद्धेश्वर महाराज यांनी केले आहे.
Leave a Reply