
कोल्हापूर: महाराष्ट्राचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण )मिरजकर तिकटी येथील ज्ञानप्रबोधिनी अधं शाळेतील मुलांना जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व जिल्हासरचिटणीस अनिलराव साळोखे यांच्या हस्ते फळे व खाऊ वाटप करून,अजितपर्व सप्ताहाची सुरवात करून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच मंगळवारपेठ, पाण्याचा खजिना येथील बालसंकुलातील मुलांना फळे व खाऊ बालसंकुलातील पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी सोबत बाजार समिती सभापती सर्जेराव पाटील गवशीकर, करवीर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब धनवडे,राणोजी चव्हाण, अवधूत अपराध, रविराज सोनुले,जयकुमार शिंदे, बालसंकुलच्या सदस्या पद्मा तिवले यांचेसह मान्यवर शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply