उंडगा’’ 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

 
कोल्हापूर: रेडस्मिथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि सायरा सय्यद व सिकंदर सय्यद निर्मित ‘‘उंडगा’’ 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक उंडगा मित्र असतो. अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या उंडगा मित्र आठवावा अशी एक गोष्ट दिग्दर्शक विक्रांत वार्डे आपल्यासाठी घेवून आले आहेत.मैल, तार्‍यांचे बेट, टुरिंग टॉकिग फेमचिन्मय संत, लागिरं झालं जी फेमशिवाजी बावकर, स्वप्नील कणसे, अरूण नलावडे, शर्वरी गायकवाड, मयुर बच्छाव इ. कलाकार चित्रपटात आहेत. पटकथा व संवाद सुदर्शन रणदिवे यांचे आहेत. कार्यकारी निर्माता श्रोणवी खामकर आहेत. संगीतही विक्रांत वार्डे यांचे असून स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे, नंदेश उमप, जसराज जोशी यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. दि. 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 110 सिनेमागृहात हा उंडगा प्रदर्शित होतोय.चित्रपटा बद्दल माहिती देताना निर्माते सिकंदर सय्यद म्हणाले, कथा,संवाद सर्व कलाकार तसेच इतर सर्व सहकारी यांनी चित्रपट बनविण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे,उत्कृष्ट कथा, चित्रीकरण आणि यातून मिळणारा सामाजिक संदेश यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!