
कोल्हापूर:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निर्मिती विचारमंच आणि अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्रात महाराष्ट्रातून तसेच बाहेरून २०० हून अधिक संशोधक,अभ्यासक,विचारवंत कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.याचवेळी आलेल्या शोधनिबंधाचे संपादन केलेल्या समग्र अण्णाभाऊ साठे या ग्रंथाचा प्रकाशित केला जाणार आहे.१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन येथे बिजभाषक म्हणून जे.एन.यु दिल्लीचे प्रा.डॉ.मिलिंद आव्हाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.प्रमुख पाहुणे घटनातज्ञ आड डॉ.सुरेश माने असणार आहेत तर अड अण्णाराव पाटील,चिमणभाऊ डांगे,प्रा.शहाजी कांबळे,सुनील कांबळे,रघुनाथ मांडरे आणि डांगे महाविद्यालायाच्या प्राचार्या डॉ.योजना जुगळे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल.दुपारच्या सत्रात गोव्याचे प्रा.श्रीकृष्ण अडसूळ,राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रा.संजय कांबळे,मुंबईचे डॉ.पद्माकर तामदाडगे यांच्यासहअनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.चर्चासत्राचा समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे असणार आहेत.यावेळी डॉ.शिवाजीराव जवळगेकर,माजी आमदार राजीव आवळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.या चर्चासत्रास अण्णाभाऊ साठे व समता प्रेमींनी तसेच पक्ष संघटना कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.डॉ.अमर कांबळे आणि अनिल म्हमाणे यांनी केले आहे.
Leave a Reply