
कोल्हापूर: कोल्हापूर प्रेस क्लबचे संस्थापक सदस्य,ज्येष्ठ पत्रकार,पुरोगामी विचारवंत आणि गेली ३७ वर्षे अखंडित सुरु असलेल्या सायंदैनिक क्रांतिसिंहचे मालक,मुद्रक,प्रकाशक आणि मुख्य बातमीदार (सर्वेसर्वा) कै.श्री प्रकाश रंगराव मोरे यांच्या रोजी ६२ व्या वाढदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पत्रकारांच्या सहाय्य्तेसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबला १० हजार रुपयांचा निधी दैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका श्रीमती सुनंदा प्रकाश मोरे आणि संपूर्ण क्रांतिसिंह परिवार यांच्या हस्ते कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे आणि उपाध्यक्ष तानाजी पोवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.पत्रकारांच्या कल्याणासाठी कोल्हापूर प्रेस क्लबची स्थापना करण्यात कै.प्रकाश मोरे यांचा मोलाचा वाटा आहे.तरी या निधीचा वापर करावा असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी काढले.पत्रकाराने पत्रकारांसाठी काहीतरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे,हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे मनोगत बी न्यूजचे मुख्य बातमीदार रवी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कै.प्रकाश मोरे यांनी नेहमीच नव्या पिढीला मार्गदर्शन केले आहे.त्यांचा वैचारिक अभ्यासाची पातळी अतिशय उच्च होती.आजच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिलेल्या या निधीचा निश्चितच पत्रकारांच्या कल्याणासाठी वापर केला जाईल अशी ग्वाही प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी दिली.यावेळी प्रकाश मोरे यांची मुलगी पत्रकार व प्रेस क्लब संचालक शुभांगी तावरे,मुलगा आदित्य मोरे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार संचालक सतीश सरीकर,पांडुरंग दळवी,मोरे कुटुंबीय यामध्ये शिवांगी मोरे,मधुरा कुलकर्णी,कमल ढेकणे,पत्रकार अक्षय थोरवत,अश्विनी टेंबे,वसंत पाटील,हिलाल कुरेशी,शिवाजीराव यादव,दयानंद जिरगे,राहुल खाडे,यांच्यासह दैनिक क्रांतिसिंहचे सर्व कर्मचारी तसेच पत्रकार,सहकारी,ज्येष्ठ पत्रकार,माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply