मिरवणूक मार्गाची महापौरांकडून पाहणी

 

कोल्हापूर :गणेशोत्सव 2017 च्या पारश वर आज महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी केली.
यामध्ये मुख्य मिरवणूक मार्ग व मिरवणूक मार्गात सामील होणाऱ्या पर्यायी रस्ते व त्याठिकाणी महापालिकेकडून लावण्यात येणारे बॅरेकटेस् व पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली. तसेच दसरा चौक ते बिंदू चौक रस्त्याची पाहणी केली. यावेळी नवीन बांधलेले चेंबर रस्त्यावर खाली वर झालेले तसेच बिंदू चौक येथे रस्त्यावर खड्डे निदर्शनास आलेने तात्काळ दुरुस्त करणेच्या सुचना उपशहर अभियंता एस.के.माने यांना दिल्या. मिरजकर तिकटी येथील पाहणी दरम्यान विद्युत तारा लोंबकळत असलेचे निदर्शनास आले असता, महापौरांनी सहाय्यक अभियंता (विद्युत) अमित दळवी यांना तात्काळ एमईसीबीसी संपर्क करुन धोकादायक तारांचा बदोबस्त करणेच्या सुचना केल्या. टेंबेरोड व मुख्य मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडयांच्या फादया छाटणेबाबत सहाय्यक उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांना सुचना केल्या. महाद्वार रोडवर अंत्यत धोकादायक असलेल्या दोन ते तीन इमारती निर्दशनास आलेने उपहशहर अभियंता आर.के.जाधव यांना सदरच्या धोकादायक इमारती तात्काळ निष्काशीत करणेच्या सुचना दिल्या. याबरोबर उमा टॉकीज, खासबाग मैदान, बिंनखाबी गणेश मंदीर, गंगावेश, पंचगंगा घाट या रस्त्यांची पाहणी केली. तसेच संबधीत अधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवामध्ये महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती महापौरांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!