स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा थाटात प्रारंभ

 

कोल्हापूर :स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा प्रारंभ आज पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते भवानी मंडप येथून करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर सौ.हसिना फरास होत्या. महापालिकेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारतची संकल्पना साकारण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. या अभियानास तीन वर्षे पुर्ण होत असल्याच निमित्ताने अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2017 पर्यंत स्वच्छता हीच सेवा मोहिम राबविण्यात येत आहे.
प्रारंभी प्रास्ताविकात आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी बोलताना महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ठ कामगिरी बजावली असून आजपर्यंत 2000 हून अधिक वैयक्तिक शौचालये शहरामध्ये बांधली आहेत. 324 सार्वजनिक शौचालये नागरिकांसाठी उपलब्ध केलेली आहेत. हागणदारीमुक्त शहर करणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील सर्वांत पहिली महानगरपालिका आहे. याच धर्तीवर घनकचरा वाहतुक, प्रक्रिया व विल्हेवाट यांचे नियोजन येत्या वर्षामध्ये पुर्ण करुन कोल्हापूर शहर हे राज्यातील पहिले स्वच्छ व सुंदर शहर करणेचे नियोजन केलेचे सांगितले. तसेच प्राचिन व ऐतिहासिक वास्तु ठिकाणी एक दिवसापुरती स्वच्छता मोहिम न राबविता वर्षभर विविध उपक्रम राबवून सर्वांचे सहभागाने स्वच्छता मोहिम राबवूया असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!