

जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त निधीतून चार बुलेट माउंटींग फायर एस्टींग्युशर व 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अनुदानामधून रोड स्विपींग मशीन भाडेतत्वावर घेण्यात आले आहे. केंद्र व राज्यशासनाच्या मंजूर धोरणानुसार गर्व्हमेंट ई मार्केट प्लस पोर्टलमधुन ऑनलाईन बुलेट माउंटींग फायर एस्टींग्युशर खरेदी करण्यात आलेल्या आहेत. बाजार भावापेक्षा कमीदराने बुलेट खरेदी झालेल्या आहेत. साधारणत: एका बुलेटला फायर इक्वीपमेंटसह रु.7 लाख खर्च आलेला आहे.
फायर एस्टींग्युशर बुलेट वाहनावर असल्याने रहदारीच्या ठिकाणी किंवा अरुंद गल्ली बोळात जाऊन प्राथमिक स्वरुपाची आग विझविण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. या उपकरणात फोम व पाणी याचे मिश्रण हवेचा दाब देऊन वापर केला जाणार आहे. हे उपकरणाचा वापर मुख्यतो ऑईल फायर, गॅस फायर, इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच एखाद्या घरात वरच्या मजल्यावर किंवा वरच्या मजल्यावर आत जावून आग विझवायची असेल तर सदरचे उपकरण फायरमनच्या पाठीवर घेवून प्रत्यक्ष आगीच्या ठिकाणी जावून आग विझविण्याचे कार्य करता येते. यामध्ये 9 लिटर पाणी, 700 मिली स्पेशल फोम व हवा यांचे मिश्रण करुन हवेच्या प्रेशर वर मोठया प्रमाणात फोम/फेस करुन आगीवर मारला जातो. त्यामुळे प्राथमिक स्वरुपाची आग तात्काळ विझविण्यास मदत होते.
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत आय.आर.बी. कंपनीमार्फत बांधलेल्या रस्त्यांच्या साफसफाईचेकामी दोन रोड स्विपिंग मशिन भाडेतत्वावर घेणेत आली आहेत. या मशिनद्वारे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जवळपास 70 कि.मी.चे रस्ते सफाई करण्यात येणार आहेत.
Leave a Reply