
कोल्हापूर: गुजरातमधिल गांधी नगर येथे आंतरराष्ट्रीय 3 ऱ्या क्रमांकाचे भव्य प्लॅस्टिइंडिया प्रदर्शन येत्या फेब्रुवारी महिन्यात 7 ते 10 या तारखेला भरविण्यात आले आहे. याचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रमोशन करण्यात येणार आहे तरी याची सुरुवात आज कोल्हापूर येथून करण्यात आली. जगातील 3ऱ्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे हे प्रदर्शन असून 2000 हुन अधिक उद्योजक यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती रिलायन्स पॉलिमर कोल्हापूरचे सत्यजित भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गेली 30 वर्ष 3 वर्षातून एकदा हे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदाचे हे 10 वे वर्ष आहे. प्लॅस्टिइंडिया या प्रदर्शनामुळे मेक इन इंडिया ही संकल्पना राबविण्यात येणार असून उद्योजकांना त्यांच्या नविन उद्योगाच्या स्थापनेपासून व्यावसायिक सर्व गोष्टींचे ज्ञान एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था या प्रदर्शनात केली आहे.भारत आणि जगात आज प्लॅस्टिक हा अविभाज्य घटक बनलेला आहे.प्लॅस्टिक इंडस्ट्री हे खूप मोठे व्यावसायिक क्षेत्र आहे. प्रत्येक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या मशिनरी,उत्पादने यांची माहिती आणि प्रात्यक्षिकसह जगातील 40 देशाचे उद्योजक यात सहभागी होणार आहेत. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रिलायन्स पॉलिमर च्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस राजीव चितलीया, चंद्रकांत तुराखीया, मुकेशभाई शहा, नितीन कोंडाळकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply