स्वतः ला स्वतःच्या प्रेमात पाडणारा ‘हंपी’ होतोय १७ नोव्हेंबरला प्रदर्शित

 

कोल्हापूर: स्वतः ला स्वतःच्या प्रेमात पाडणारा ‘हंपी’ हा मराठी चित्रपट १७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही वास्तू, शहरे ही फक्त पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची नसतात तर चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हंपी या चित्रपटात वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आणि इतिहासातील महत्वाचे शहर असणारे हंपी ची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.चित्रपटाची कथा या ठिकाणाशी संबंधित आहे. आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने संपूर्ण टीम कोल्हापुरात आली होती. या टीमने पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव,छाया कदम,विजय निकम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हंपी च्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांची आधीच पसंती मिळत आहे.हंपी हे शहर माणसाचं आयुष्य कस बदलत याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.१७ तारखेला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. आदिती मोघे यांनी याची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.तर कोणालाही प्रेमात पाडायला लावणाऱ्या हंपी या ठिकाणाची सफर करायला १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!