
कोल्हापूर : दक्षता जनजागृती सप्ताह 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ दुर्गा चौक येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पुणे परिक्षेत्र पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, ॲन्टी करप्शन ब्युरोचे पेालीस निरीक्षक सुनिल वायदंडे व प्रविण पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ, व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्यासह ॲन्टी करप्शन ब्युरोमधील कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीतील विद्यार्थ्यांनी लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे, भ्रष्टाचार टाळा देश मजबुत करा, लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा, कायदेशीर व्यवहार दूर ठेवा भ्रटाचार, भ्रष्टाचार निर्मुलनाचा विचार करे लोकशाही साकार व लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया इत्यादी घोषणा देवून भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती करण्यात आली. ॲन्टी करप्शन ब्युरीकडे कार्यान्वित असलेला टोल फ्री क्रमांक 1064 चा उल्लेख असलेले भ्रष्टाचारा विरुध्दचे पोस्टर्स प्रदर्शित करुन भ्रष्टाचार विरुध्दच्या तक्रारी देण्याबाबत आवाहन करण्यात आले. रॅलीमध्ये कोल्हापुरातील शाळा, कॉलेज, आय.टी.आय., एन.सी.सी., व्हाईट आर्मी, अग्निशमन दल, वन विभाग, गृहरक्षक दल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, लाचलुचपत पतिबंधक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीच्या समारोप प्रसंगी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी भ्रष्टाचाराविषयी जनजागृती, ॲन्टी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली व भ्रष्टाचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.
रॅली शिवाजी रोड, शिवाजी पुतळा, माळकर चौक, महानगरपालिका, सी.पी.आर.हॉस्पिटल मार्गे छत्रपती शाहू स्मारक भवन हॉल दसरा चौक येथे सांगता झाली.
Leave a Reply