स्वप्नील जोशीची पहिली टेलिव्हिजन निर्मिती स्टार प्रवाहवर; २७ नोव्हेंबरपासून नवी मालिका ‘नकळत सारे घडले’

 

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका 27नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून,हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुन सिहं बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत,या मालिकेची निर्मिती केली आहे .स्टार प्रवाहनं आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. या मालिकेचा नुकताच लाँच केलेल्या प्रोमोचा लुक एकदम फ्रेश आहे. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातलं विलक्षण नातं यात पहायला मिळत आहे. लोकप्रिय मालिकांमुळे परिचित असलेले हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर या प्रोमोमध्ये दिसत असून बाल कलाकार सान्वी रत्नलिकरचे लोभस,गोड दिसणे लक्षणीय आहे.मात्र, मालिकेच्या कथानकाचा अद्याप उलगडा झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!