
कोल्हापूर : सीआयआय (कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) ही भारतातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये इनव्हेस्ट इन कोल्हापूर 2017 हे प्रदर्शन 18 ते 21 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर या धर्तीवरील हे प्रदर्शन असणार आहे.हे प्रदर्शन येथील शाहूपूरी जिमखाना मैदान येथे भरविण्यात येणार आहे.या प्रदर्शनासाठी लागणार्या भव्य मंडप उभारणीचा शुभारंभ आज स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील,कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर,गोशिमाचे अध्यक्ष सुरजीतसिंह पवार,सीआयआयच्या विशाखा आपटे व विश्वनाथ पवार,क्रिएटीव्हजचे सुजीत चव्हाण, तसेच आझम जमादार आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
60000 स्केवर फूट मंडप शाहूपूरी जिमखाना मैदानावर उभा करण्यात आला आहे.याठिकाणी कॉन्फरन्स हॉल,व साधारणपणे दीडशे स्टॉल धारकांचे स्टॉल असल्याने तशी मंडप उभारणी केली जात आहे.पिअरलेस मंडप उभा करण्यात येत आहे.या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटीव्हज एक्झीबिशन अॅन्ड इव्हेंट या संस्थेने केले असून प्रदर्शनामध्ये देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स व त्यांच्या मोठ मोठ्या मशिनरी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्वच उत्पादनांचे स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत.
उद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. मेक इन इंडियाचा भारत घडवायचा आहे यासाठीच सीआयआय काम करीत आहे.ही संस्था कोल्हापूरमध्ये येवून हे प्रदर्शन भरवित असून कोल्हापूरचे नाव मोठे करण्याचा संस्थेचा मानस आहे.दरवर्षी इंडस्ट्रिया हे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये होत होते. यावर्षी प्रथमच सीआयआय ही भारतातील सर्वात मोठी संस्था या प्रदर्शनात उतरत असून याचा निश्चितच लाभ हा कोल्हापूरसह ,कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना होणार आहे. व विविध कंपन्यांची उत्पादनेही या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचणार आहेत.
चार दिवस चालणार्या या प्रदर्शनामध्ये बी टू बी सेशन होणार आहे.पॅनल डिस्कशन होणार आहे, याचबरोबर बिझनेस वर्कशॉप होणार असून इंटरॅक्टीव्ह सेशनसह सेमिनारही आयोजित करण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनास 25 हजारच्या आसपास उद्योजक भेट देतील असा मानस आहे. त्या दृष्टीने याची आखणी ही केली जात आहे. या प्रदर्शनास कोल्हापूर चेेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज, गोशिमा,स्मॅक,फौंड्रीमन असोसिएशन,मॅक,ब्लिमा, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन, उद्यम सोसायटी,एमएसएमई,आदी संस्था सहकार्य करणार आहेत.
Leave a Reply