भारतीय वैद्यकीय कला डॉक्टरांनी जिवंत ठेवली पाहिजे : प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ प्रा.डॉ.अजित वरकुड

 

कोल्हापूर: आज भारतात स्त्रियांमध्ये कुपोषणामुळे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.गर्भाशयाच्या पिशवी काढण्याच्या तीन पद्धती आहेत.त्यापैकी भारतीय पारंपारिक पद्धत म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भाशयाची पिशवी काढणे ही पद्धत सध्या लोप पावत चाललेली आहे.आजच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात डॉक्टर्सनी आपली भारतीय वैद्यकीय कलेलाच प्राधान्य देऊन ती जिवंत ठेवली पाहिजे अशी अपेक्षा प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ प्रा.डॉ.अजित वरकुड यांनी कोल्हापूर ऑब्सटेट्रिक्स अँड गायनोकोलॉजिकल सोसायटीचे पहिले वार्षिक अधिवेशन ‘ग्लोरियस २०१७’ मध्ये व्यक्त केली. डॉ.शशिधर कुडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. याप्रकारच्या पद्धतीत खर्च खूप कमी येतो.गुंतागुंत कमी असते.नैसर्गिक पद्धतीत तोटे कमी आहेत आणि फायदे जास्त आहेत. तर याउलट लॅप्रोस्कोपी करून गर्भाशय पिशवी काढताना स्त्रीला त्रास होणाची शक्यता असते.शरीराच्या आजूबाजूच्या अवयवांना अपाय होण्याची शक्यता असते.तुलनेने खर्चही जास्त येतो. म्हणून नैसर्गिक पद्धतच योग्य आणि सुरक्षित आहे.हि पद्धत मूलतः भारतीय आहे.संपूर्ण जगात फक्त भारतीय सर्जन ही पद्धत वापरतात.पण याचे प्रमाण खूप कमी होत आहे.जुने ते सोने हे सध्या नवीन युगात डॉक्टर्स विसरत चालले आहेत.पूर्वी हे प्रमाण १०० पैकी ९० टक्के होते तेच आता ९० टक्के स्त्रिया लॅप्रोस्कोपी करतना दिसत आहेत.हे जागतिक संशोधनाने सिध्द झाले आहे. सध्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. असेही डॉ.वरकुड यांनी सांगितले.दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये आज दुसऱ्या दिवशी वारंवार होणारे गर्भपात कसे रोखावे या विषयवार डॉ.आशा रेड्डी,डॉक्टरांच्या दैनदिन कामकाजात येणारे कायदेशीर अडचणी यावर डॉ.चैतन्य दातार,नलिका गर्भाची शस्त्रक्रिया सुरक्षितता व कायदेशीर गर्भपात यावर डॉ.संकल्प सिंघ,डॉ मिलिंद पिशवीकर, डॉ भारती अभ्यंकर आणि डॉ.सचिन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. के.ओ.जी.एस.च्या संयुक्त सचिव डॉ.गौरी साईप्रसाद यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.सचिव डॉ.पूनम आमटे यांनी आभार मानले.कार्यक्रमास के.ओ.जी.एस.चे अध्यक्ष डॉ.अजित पाटील, उपाध्यक्ष डॉ.सुहास कोठावले,डॉ.तानाजी पाटील,डॉ.प्रवीणकुमार लोहार,डॉ.निलिमा शहा,डॉ.प्रवीण हेंद्रे, डॉ.अमोल पाटील,डॉ.गीता बालसकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा,पश्चिम महाराष्ट्र,कर्नाटक येथून २०० हून अधिक तज्ञ डॉक्टर्स,गायनोकोलॉजिकल सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!