
कोल्हापूर: प्रत्येकाला आपले घर,ऑफिस सुंदर आणि वेगळे दिसावे अस वाटत असते.घर बांधून झाले की त्याची सजावट करणे म्हणजेच इथे इंटेरिअर डिझायनर आणि आर्किटेक्ट यांचे काम सुरू होते. या क्षेत्राशी संबंधित इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स म्हणजेच आयआयआयडी ही संस्था भारतात 1972 साली स्थापन झाली. संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. संपूर्ण भारतात प्रमुख शहरांमध्ये या संस्थेच्या एकूण 30 शाखा असून भारताबाहेर दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात या संस्थेला ग्लोबल ब्रँड मिळालेला आहे. भारतात या संस्थेचे दहा हजारांहून अधिक सभासद असून कोल्हापूरमध्ये याचे 250 सभासद आहेत. एशिया पॅसिफिक स्पेस डिझाईनर असोसियेट या जागतिक स्तरावरील संस्थेने या संस्थेला सदस्यत्व दिले आहे. कोल्हापुरात या संस्थेची स्थापना 15 नोव्हेंबर 1997 साली झाली. अंतर्गत सजावट संबंधित या संस्थेला 2017 म्हणजे यंदा 20 वर्षं पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्ती सोहळ्यासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच बडोदयाचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट हितेश मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल अयोध्या येथे आयोजित केला आहे. अशी माहिती संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पार्षद वायचळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कार्यक्रमात सर्व माजी अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात येणार आहे. असेही आर्किटेक्ट वायचळ म्हणाले. भारत ही मोठी व्यापारपेठ आहे. बांधकाम क्षेत्राबरोबरच या क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. याचा लाभ कोल्हापुरातील या क्षेत्राचे शिक्षण घेणारे विद्यार्थी जाणकार व तज्ज्ञ यांना व्हावा यासाठी नेहमीच संस्थेच्यावतीने नामवंत आर्किटेक मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जातात. तसेच संस्थेला 2014 साली राष्ट्रीय स्तराचे अधिवेशन घेण्याचा मान मिळालेला आहे.या कार्यक्रमास विद्यार्थी,संस्थेचे सभासद यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.पत्रकार परिषदेला संचालक किशोर पाटील, खजानिस चंदन मिरजकर, संदीप घोरपडे, संजय चराटे ,वृंदा परुळेकर, वर्षा वायचळ यांसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply