

चार दिवस चालणार्या या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्यांचे स्टॉल्स व त्यांच्या मोठ मोठ्या मशिनरी व उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्वच उत्पादनांचे स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत.यावेळी बोलताना सीआयआयचे अध्यक्ष श्री योगेश कुलकर्णी यांनी इनव्हेस्ट इन कोल्हापूर हे प्रदर्शन उद्योग क्षेत्राला व इंजिनियरिंग करणार्या विद्यार्थ्यांना निश्चितच दिशादर्शक असणार आहे असे सांगितले. या प्रदर्शनास कोल्हापूर चेेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज, फौंड्री इक्वीपमेंट,गोशिमा,स्मॅक,फौंड्रीमन असोसिएशन,मॅक,स्लिमा, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन, उद्यम सोसायटी,एमएसएमई,आदी संस्था सहकार्य करणार आहेत.उद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये फौंड्री इक्वीपमेंट,बॉश,शिकागो न्यूमॅटिक,किर्लोस्कर, हिंडाल्को इंडस्ट्रिज लि.,ग‘ीव्हज पॉवर लि,बीपीको इंडस्ट्रियल टुल्स,इंडो स्पार्क कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस,फारो,त्रिलोकलेझर्स,गगनन्त सोल्युशन्स अॅन्ड सर्व्हिसेस,फ‘ोनियस इंडिया,महिंद्रा,ड्रायमॅटिक इंजिनियरींग,मयुरा स्टील्स,पायोनियर,रेक्झनॉल्ड इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कंट्रोल लि,मॅसीबस ऑटोमेशन अॅन्ड इन्स्ट्रयुमेंटेशन, एसएचके पॉलीमर्स इंडस्ट्रिल,केपी मशीन्स,सारस्वत को-ऑप बँक लि,वंडर केमिकल अॅन्ड कोटिंग्ज,युनीमॅक सॉफ्टवेअर प्रा.लि,एअरटेक न्यूमॅटिक,मॅक अॅन्ड टेक थ‘ीडी प्रिंटर्स, जीमको लि,कन्सलन्यूवॅट सर्व्हिसेस,पॉझीट्रॉनिक इब्स्ट्रॉक,शेअर इकॉनॉमी,गुरूदत्त सीएनसी,सीडबी आशा दीडशेहून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने यांचे स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत.प्रदर्शनामध्ये पॅकेजिंग ,सोलर, ,वेव्हींग मशिन,स्टोअरेज सिस्टीम,सेफ्टी इक्वीपमेंट ,कटिंग टुल्स,हायड्रोलिक्स,क‘ेन,बेअरिंग्ज,नट बोल्टस,मटेरियल हॅन्डलिंग,न्यूमॅटिक टुल्स,बँकींग ,ऑईल, चेन्स अॅन्ड पुलिज, टेम्परेचन इंडीकेटर इंडस्ट्रियल एअरकुलर अॅन्ड इव्हा पोटेटिव्ह सीसी सिस्टीम आदी विविध उत्पादने पहावयास मिळणार आहेत.60000 स्केवर फूट मंडप शाहूपूरी जिमखाना मैदानावर उभा करण्यात आला आहे.याठिकाणी एसीयुक्त कॉन्फरन्स हॉल,व साधारणपणे दीडशे स्टॉल धारकांचे स्टॉल असल्याने तशी मंडप उभारणी केली गेली आहे.पिअरलेस मंडप उभा करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा उपयोग हाकोल्हापूर,सांगली,सातारा,बेळगांव, कोकण याठिकाणच्या उद्योजकांना अधिक होणार आहे.याचबरोबर इंजिनियरींग कॉलेजच्या विद्यार्थ्याना होणार आहे.कोल्हापूर शहराचा विकास हा झपाट्याने वाढू लागला आहे. नवनवीन उद्योग या ठिक़ाणी येऊ लागलेले आहेत. कोल्हापूर तसेच आजुबाजुच्या उद्योजकांना नव्या तंत्रज्ञानाची आणि नव्या उद्योगांची माहिती होणे हे आता गरजेचे झाले आहे. कोल्हापूरची ओळख ही सर्वच क्षेत्राच्या माध्यमातून वाढू लागली आहे. उद्यम नगरी ही सर्वांनाच परिचित आहे. याठिकाणी येऊ घातलेल्या नव्या उद्योगांना चालना मिळावी कोल्हापूरची ओळख ही सर्वच क्षेत्राच्या माध्यमातून वाढू लागली आहे. कोल्हापूरची योग्य ती माहिती व्हावी यासाठी कोल्हापूरमध्ये होत असलेले हे प्रदर्शन एक नवी चालना देणारे ठरणार आहे.
प्रदर्शनामध्ये 18 नोव्हेंबर रोजी उद्योग क्षेत्रात भारतात सुरूवातील संधीवाढ,19 रोजी आदराधित्य पर्यटन क्षेत्रात वाढीची संधी, इलेक्ट्रीक व्हेईकल गतीशीलता संधी आणि पुढे त्याच्यावर विचार विनिमय,भारतीय महिला नेटवर्क, 20 नोव्हेंबर रोजी व्यवसायापासून व्यवसाय-अॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरींग ,व्यापार व्यवसाय -संरक्षण उत्पादन 21 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात कौशल्य विकसित योग्य विचार केला जाणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला सीआआयचे मोहन घाडगे,प्रताप पुराणिक,सचिन शिरगांवकर,भरत जाधव,विशाखा आपटे,पल्लवी कोरगांवकर , इंजिनियरींग असोसिएशनचे बाबासाहेब कोंडेकर,गोशिमाचे सूरजितसिंह पवार,स्मॅकचे राजू पाटील,फाईव्ह स्टार एमआयडीसीचे अध्यक्ष हरिशचंद्र धोत्रे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी ,फौंड्री इक्वीपमेंटचे रविंद्र शिरपूटकर यांच्यासह कि‘एटीव्हजे सुजीत चव्हाण यांची उपस्थिती होती
Leave a Reply