
कोल्हापूर – संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी हिंदी चित्रपटात चित्रपटात भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरूष-वीरांगणा यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाविषयी विविध हिंदु संघटनांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. याचप्रकारे दशक्रिया चित्रपटातही ब्राह्मण समाज, हिंदूंच्या परांपरा, श्राद्धविधी यांवर जाणीवपूर्वक टीका करून दोन समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी जनभावनेचा विचार करून या दोन्ही चित्रपटांवर बंदी आणावी, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना हॉटेल सयाजी येथे २५ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, शिवसेनेचे किशोर घाटगे, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख जयदीप शेळके, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष मनोहर सोरप, विश्व हिंदु परिषदेचे शहरप्रमुख अशोक रामचंदानी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, शहराध्यक्ष शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण महासंघाचे सर्वश्री मयुर तांबे, आशिष जोशी, सचिन पितांबरे, सौ. सरोज फडके, हिंदु धर्माभिमानी नितीन निकम उपस्थित होते
Leave a Reply