

चंदना या शॉर्टफिल्मचे कथानक हे दोन गाण्यांभोवती गुंफण्यात आले असून लगबग चालली ….. या गाण्याचा व्हिडीओ नुकताच सोशल साईट्सवर प्रदर्शित केला आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग समजला जातो आणि त्याचा स्त्रीच्या शिक्षणावर परिणाम होतो. यातूनच समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीचा आपल्याला अनुभव येतो. नेमका अनोख्या पद्धतीने या गाण्यात हा विषय मांडण्यात आला आहे. संगीता बर्वे लिखित या दोन्ही गाण्यांसाठी नव्या दमाच्या संगीतकार सुहित अभ्यंकर गायिका राजेश्वरी पवार आणि गायक ॐकारस्वरूप बागडे यांनी आजकालच्या आयटम सॉंग्सच्या जमान्यात फीलगुड गाणी तयार केली असून स्त्री शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाला महत्व दिले हे खरंच कौतुकास्पद आहे. याच गोष्टीमुळे सागरिका म्युझिकने यावर शॉर्टफिल्म तयार करण्याचा आणि ती दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला.
“चंदना” या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अश्विनी गिरी, मीरा जोशी आणि सुखदा बोरकर यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळणार आहे.
Leave a Reply