
कोल्हापूर : कोल्हापुरात शुट झालेला कॉमेडी मन्ना शेठ येत्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. `व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे जगामध्ये भिन्न प्रकारचे लोक पाहायला मिळतात. असेच एक अंतरंग व्यक्तीमत्त्व असलेले मन्ना शेठ ही फिल्म आहे. महेश मुळे यांनी निर्मित केलेल्या धम्माल विनोदी, मराठी फिल्म मन्नाशेठ’ द्वारे हे मन्नाशेठ पडद्यावर येत आहेत. कथा, पटकथा, संवाद, लेखन महेश मुळे यांचे असून दिग्दर्शन जगदिश वाठारकर यांनी केले आहे. जगदिश वाठारकर यांनी यापूर्वी पैशाचा पाऊस, प्रेमाय नम:, घरवाली हुषार अशा गाजलेल्या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. संगीत के संदीपकुमार यांनी केले. गाणी दाक्षिणात्त्य गायक साईचरण अश्वत्थ, लोकेश, सोमय्या, हरीप्रिया तसेच महेश मुळे यांनी गायले आहे. निर्माता महेश मुळे हे मुळचे वर्ध्याचे असून त्यांचे अजोबा शामराव बुवा मुळे हे संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे महेश मुळे यांनी नाट्य व चित्रपटाची आवड निर्माण झाली त्यातूनच त्यांनी शामरावबुवा मुळे फिल्मस् कंपनीची स्थापना केली. फिल्ममध्ये महेश मुळे यांची प्रमुख भूमिका असून शिल्पा गोंजारे, गिरीजा गोरे, वर्षा अष्टेकर, डॉ. आरती कुलकर्णी, प्रकाश पाटील, कु.कमलेश वाठारकर, कविता चव्हाण, कु. निमीषा जाधव, सुरेश मेस्त्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. असा विनोदी आगळा-वेगळी फिल्म 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply