
कोल्हापूर: शिक्षणाचे बाजारीकरण, बारावीच्या परीक्षेचा करण्यात आलेला अनुभव आणि त्यामधून पालकांना आलेले टेन्शन अशा विविध मुद्दयांवर अतिशय रंजक आणि खोचक पद्धतीनं दिग्दर्शक दीपक पाटील यांनी प्रकाश टाकून ‘बारायण’ या चित्रपटाची मांडणी केली आहे.
चित्रपटातून निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्यात आला आहे. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस प्रॉडक्शन’ निर्मित असणारा बारायण चित्रपटाची प्रस्तुती भाजपच्या नेत्या शायना एन.सी यांनी केली आहे. दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी दीपक पाटील यांनी दूरचित्रवाहिनीसाठी प्रोमो डिरेक्टर म्हणून काम केले आहे.
अभिनेता अनुराग वरळीकर प्रमुख भूमिकेत असून नंदू माधव हे वडिलांच्या भूमिकेत आहेत, तर आईच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकर आहेत. आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे, निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. बारायण चित्रपटाची कथा दीपक पाटील यांनीच लीहली असून पटकथा संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. तर छायाचित्रण म्हणून मर्जी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांचे मधुर संगीत लाभले आहे. आशिष झा यांनी पार्श्वसंगीत दिले असून अल्का याग्निक यांनी देखील मराठी गाण्याला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे बारायण हा चित्रपट थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे
Leave a Reply