शिवजयंतीनिमित्त श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे ‘शिवमहोत्सव २०१८’ चे आयोजन

 

कोल्हापूर: श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे गेली ४ वर्षे झाली विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात यामध्ये कुभांरवाडी हायस्कूल कुभांरवाडी शाळेमध्ये बायोमेट्रिक मशीन तसेच चप्पल वाटप जिजाऊ जयंतीला ५ मुली शिक्षणासाठी दत्तक आणि सीपीआर मध्ये त्यादिवशी जन्मलेल्या मुलींना जॉन्सन बेबी केअर कीट वाटप असे उपक्रम घेण्यात येतात.श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे
१७ ते १९ फेब्रुवारी शिवमहोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.साक्षी पन्हाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
गेली २ वर्षापासुन श्रीमंत जिजाऊ फौंडेशनतर्फे शिवजयंती निमित्त शिव महोत्सवाचे आयोजन भव्य प्रमाणात केले जात आहे .या वर्षी शिवाजी चौक येथे ३ दिवस शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवराय आणि जिजांऊच्या ९ फुट महाराष्ट्रातील एकमेव मुर्तीचे १७ फेब्रुवारी रोजी अंध अपंग मुला मुलींच्या हस्ते प्रतिष्ठापना व उद्घाटन होणार आहे तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मुर्तीचे पुजन व आरती
यावर्षीचा श्रीमंत जिजाऊ पुरस्कार सौ.अफसाना नदाफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक कलादर्शन घडवणारा ‘गीतराधाई’ हा ५१ कलाकारांचा सहभाग असणारा कार्यक्रम आणि १९ फेब्रुवारी मुख्य शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी महिला ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक शिवाजी चौकातुन चालु होवुन मिरजकर तिकीटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी  मिरवणुक विसर्जन करण्यात येईल.
हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे संध्याकाळी ६:३० नंतर होतील अशी माहिती सौ.साक्षी पन्हाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला रेश्मा मुजावर,रेवती घोरपडे,ॠतुजा मोरे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!