रांची येथे एनयुजे ( इंडिया)चं व्दैवार्षिक संमेलन

 

रांची: नँशनल युनिअन ऑफ जर्नलिस्ट (इंडिया)चं व्दैवार्षिक संमेलन झारखंडमधील खेळगाव, रांची येथील डाँ एन के त्रिखा नगरात संपन्न झालं. यावेळी लोकशाहीची सगळ्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारांवर आहे असे प्रतिपादन मा.केंद्रीय मंत्री सूबोधकांत सहाय यांनी केलं. रांची, खेळगाव येथील डॉ.राम दयाळ मुंडा सभागृहात बोलत होते. आजची आणि पूर्वीची पत्रकारिता यात प्रचंड तफावत आहे, आज नेटवर्किंग जर्नालिझमचा काळ आहे, याचा फायदा सामान्य लोकांना होत आहे, असेही त्यांनी म्हटले. तसेच शासनाची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात प्रिंट मीडियाचा महत्वाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले, निष्पक्ष आणि निर्भय पत्रकारितेच त्यांनी कौतुक केलं, सोबतच अशाच पत्रकारितेने देश व समाजाचे भलं होईल हे सांगताना त्यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे यावे यासाठी प्रयत्नशील असण्याचा त्यांनी आश्वासन दिले. झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली, सद्य स्थितीत पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतं आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कायदे करून त्यांनी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ले होणे हे देशहिताचे नाही, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचंही कोडा यांनी म्हंटले.यावेळी प्रेस काऊन्सिलच्या धर्तीवर सर्वसमावेशक मीडिया काऊन्सिलच्या मागणीने जोर धरला.एनयूजे (इंडिया)च्या जनरल बॉडीच्या बैठकीत दिवंगत पत्रकारांना  श्रद्धांजली अर्पण केली गेली.व्यासपीठावर उपस्थित असलेले एनयूजे (इंडिया)चे पदाधिकारी रजत कुमार गुप्ता, प्रज्ञानंद चौधरी, भूपेन्द्र गोस्वामी, सीमा किरण, सय्यद जुनैद, रतन दीक्षित आणि शिव कुमार अग्रवाल यांनी सध्या पत्रकारांवर होणा-या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. सोबतच एक प्रस्ताव पारित करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा तयार करणे, मजीठिया आयोगाच्या सिफारिशीनुसार अनुरूप वेतन देणे, स्वास्थ्य बीमा योजना राबवण्यासाठी सरकारसोबत सातत्याने बातचीत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.त्याचप्रमाणे अन्य प्रदेशांमधील एनयूजेच्या कार्यक्रमांची रूपरेषाही ठरवण्यात आली. यावेळी युवा नेते अजयनाथ शाहदेव यांनी रांचीत होत असलेल्या या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले, प्रसारमाध्यमे ही सरकार आणि समाज यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा आहेत असेही ते म्हणाले.आजही ग्रामीण भागात  वृत्तवाहिन्यांपेक्षा वृत्तपत्र अधिक वाचली जातात, स्थानिक वृत्तपत्रे ग्रामीण समस्यांवर वाचा फोडतात, देश हितासाठी  पत्रकारांचं जितकं योगदान आहे तितकं राजकीय नेत्यांचंही नाही असे शाहदेव यांनी म्हटले. जेव्हा सरकार कडून पत्रकारांना विरोध होतो तेव्हा पत्रकारिता योग्य दिशेने जातं आहे हे स्पष्ट होतं, असेही प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी एनयुजेचे महाराष्ट्राचे  प्रमुख मार्गदर्शक  शिवेंद्र कुमार  आणि महासचिव शीतल करदेकर यांच्या सोबत राज्यातील  प्रमुख प्रतिनिधी  उपस्थित होते. यात महिला प्रतिनिधींचा मोठा सहभाग होता… संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात युनियनच्या आगामी उपक्रमांवर आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयावर  महत्वपूर्ण चर्चा झाली आणि काही प्रस्ताव पारित करण्यात आले.यावेळी झारखंड सरकारचे खाद्य आणि पुरवठा मंत्री सरयू राय उपस्थित होते.देशात मोठ्या वेगाने बदलाचे वारे वाहत आहेत… त्यातच मीडियाची जबाबदारी आणखी वाढलेली आहे, असं  त्यांनी म्हटलं. राय यांनी पत्रकार सुरक्षा कायदा बनवण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलणार असल्याचं आश्वासन दिलं. या कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या सद्यस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.तसंच दगड फोडणा-या लोकांच्या रोजगाराबाबत निर्माण होणा-या समस्यांवर पत्रकारांनी आवाज उठवावा असं आवाहनही या कार्यक्रमात मंत्री सरयू राय यांनी केलं.या कार्यक्रमात  देश आणि समाजाचं हित यात महत्त्वाची भूमिका  निभावणा-या मीडियाकर्मींचं कौतुक झारखंडचे मंत्री सीपी सिंह यांनी केलं.मीडियाला आपलं काम हे इमानदारीने करावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं.यावेळी पश्चिम बंगालचे वरिष्ठ पत्रकार प्रज्ञानंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीने आपली जबाबदारी सांभाळली. झारखंडचे शिव कुमार अग्रवाल यांचं नाव हे यूनियनचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जाहीर झालं.या कमिटीत इतर राज्यांच्या प्रतिनिधींवरही नव्या जबाबदा-या सोपवल्या गेल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!