
मुंबई (स्पीड न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 भिकारी असल्याची धक्कादायक माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना हा अहवाल सादर केला.
देशात भिकाऱ्यांची सर्वाधिक संख्या पश्चिम बंगालमध्ये (81 हजार 244) आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (65 हजार 835) असून तिसऱ्या क्रमांकावर बिहार (29 हजार 723) तर महाराष्ट्रात एकूण 24 हजार 307 भिकारी आहेत.
Leave a Reply