
कोल्हापूर : बऱ्याच चर्चेनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचं लग्न ठरलं आहे. एका वृत्तपत्रानुसार, सोनम 11 आणि 12 मे दरम्यान दिमाखदार सोहळ्यात जिनिव्हात लग्न करणार आहे.
या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रण देण्याची सर्व जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे कळत आहे. संगीत, मेहंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडत तिच्या विवाहसोहळ्याची रंगत वाढणार आहे. सोनमने वेडिंग ड्रेसची जबाबदारी अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिली आहे. वेडिंग वॉर्डरोबचे काम ब्रिटिश डिझायनर टमारा राल्फ आणि मायकल रूसो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे
Leave a Reply