

यावेळी डॉ अतुल जोगळेकर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. जोगळेकर म्हणाले, आपण दिलेल्या देणगीचा सुयोग्य वापर होत आहे की नाही हे पाहणे गरजेचे असते. वैदयकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळेच मेडिकल असोसिएशनला हा निधी सुपूर्द केला. याचा मला अभिमान वाटतो.
मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रवींद्र शिंदे म्हणाले, मेडिकल असोसिएशनच्या स्वतः च्या इमारती व विस्तारीकरणासाठी निधी संकलनाचे आवाहन केले याला प्रतिसाद देत नेत्रशल्यविशारद डॉ.अतुल जोगळेकर यांनी २० लाख रुपये निधी देऊन मदतीचा मोठा हात दिला आहे.
डॉ जोगळेकरांच्या या दातृत्वामुळे गेली ९४ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या मेडिकल असोसिएशनच्या कार्याला मोठा हातभार लावला गेला असे मानद सचिव डॉ संदीप साळोखे यांनी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष डॉ.कर्नल मोहन जोशी, डॉ .नंदकुमार जोशी, डॉ. राधिका जोशी, रोहिणी लिमये यांनी देणगी दिली. डॉ.अशोक भूपाळी व डॉ अजित चांदलकर यांचा विशेष सहसकार्यबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन डॉ गीता पिलई यांनी केले.
यानंतर अखियोंके झरोकेसे या संगीत मैफिलीचा आस्वाद रसिकांनी घेतला.
यावेळी डॉ. आनंद कामत, डॉ. पी एम चौगले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. संजय घोटणे, डॉ. मंदार जोगळेकर, वसुधा जोगळेकर, गौरी जोगळेकर, डॉ. प्रिया शहा, डॉ. सूर्यकांत मस्कर, निरंजन वायचळ, डॉ. शिरीष पवार, डॉ. अजय शिंदे यांच्यासह डॉक्टर्स व तज्ञ उपस्थित होते.
Leave a Reply