वाट दाखवी आम्हा, गौरीनंदना…हे गजानना प्राजक्ताची गजाननाला साद

 
चित्रपट… एक असं माध्यम ज्याने आयुष्य खूप सोपं होऊन जातं. बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हेच माध्यम आपल्या कामी येतं. आयुष्यात पदोपदी त्या विघ्नहर्त्याला साद घालणाऱ्या भाविकांसाठी रणांगण चित्रपटाचं नवं गाणं नुकतंच लाँच झालं आहे. या गाण्यात प्राजक्ता माळी गजाननाला साद घालताना दिसते आहे. तर सचिन पिळगांवकर, सुचित्रा बांदेकर, स्वप्नील जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे या गणरायासमोर नतमस्तक आहेत.
गणेशभक्तांच्या भावना व्यक्त करणारे शब्द लिहिले आहेत गुरू ठाकूर यांनी तर शशांक पोवार यांनी संगीत दिलं आहे. वैशाली माडेच्या आवाजात नटलेलं हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे. 
आपल्या हक्कांची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेल्या युवकाची कथा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी मांडली असून या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे.
नात्यांना लागलेला सुरूंग हा विघ्नहर्ता कसा सोडवतो हे चित्रपट पाहिल्यावर कळेलंच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!