
कोल्हापूर: कोल्हापूर पर्यटन विकास व्हावा या दृष्टीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून अडवाटेवरच कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम एप्रिल व मे महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अडवाटेवर असलेली निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे,गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगल परिसर,देवराई अश्या परिसराला भेट देणारी दोन दिवस मुक्कामाची सहल भोजन व्यवस्थेसह मोफत आयोजित करण्यात आली आहे.हिल रायडर्स फाउंडेशन, ऍक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी या सहलीचे मोफत आयोजन केले असून हॉटेल मालक संघ,विविध संघटना बचत गट यांच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे.१३ एप्रिल पासून २६ मे दरम्यान प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी, रविवारी अश्या एकूण चौदा सहली असणार आहेत. प्रथम येणाऱ्या प्राधान्याने १०० व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. यासाठी www.unexploredkolhapur.com या वेबसाईटवर नोंदणी आवश्यक आहे.
या सहलीत गौतम बुद्ध,सम्राट अशोक, सातवाहन यादव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीतील अनेक वारसास्थळे शिलालेख ,गुहा, वास्तू, गड, मंदिरे व युध्दभूमी यांचा समावेश असणार आहे. जंगलात निवास, व नदीकाठ धरणाचा जलाशय देवराई रानमेवा यांचा आनंद घेत निसर्गभ्रमंती करता येणार आहे शिवाय निरभ्र आकाश दर्शनासह जंगलट्रेक व लोककला याचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. आणि स्थानिक पदार्थ, मसाले, वस्तू याची खरेदी देखील करता येणार आहेत. एकूणच आडवाटेवरच कोल्हापूर ही पर्यटकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे अशी माहिती निसर्ग तज्ञ उदय गायकवाड व अनिल चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विद्याप्रबोधिनी चे अध्यक्ष राहुल चिकोडे हे अध्यक्ष प्रमोद पाटील ऍक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव राहुल कुलकर्णी ,चारुदत्त जोशी व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply