
स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ या लोकप्रिय आणि आघाडीच्यामालिकेतील विलास आणि राधा या जोडीचं म्हणजेच विराचंअनेक अडचणींना, कारस्थानांना सामोरं जात लग्न झालाआहे. लग्नानंतर विराचं नवं आयुष्य सुरू होणार, की नवीसंकटं पुन्हा मागे लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.यातल्या काही प्रश्नांची उत्तरं रविवारच्या महाएपिसोडमध्येमिळणार आहेत. ‘गोठ’ या मालिकेचा महाएपिसोड रविवारी,१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ७ वाजता फक्तस्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.विलास आणि राधा यांचं लग्न झालं असलं, तरी नीला काहीत्यांच्या आयुष्यातून जाण्याची चिन्हं नाहीत. प्रेग्नंट असलेलीनीला पुन्हा म्हापसेकरांच्या घरात आली आहे. तिच्या पोटातवाढणारं बाळ विलासचं आहे असं तिचं म्हणणं आहे. हे सत्यआहे की नाही, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. यावरूननवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच विलासआणि राधा यांचं सुख अनेकांच्या डोळ्यात खूपत आहे.त्यामुळे नीलाच्या परत येण्यात काही वेगळा डाव आहे का,हेही पहावं लागेल.विराच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी नचुकता पहा गोठचा महाएपिसोड रविवारी, १ एप्रिल रोजीदुपारी १ आणि रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply