
कोल्हापूर : यंदा हज यात्रेसाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 500 हज यात्रेकरूंसाठी आज येथील मुस्लिम बोर्डिंग मध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात हाजी नजीर मिस्त्री,हज फौंडेशनचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर, हाजी दिलावर मुल्लाणी यांनी महिला आणि पुरुष हज यात्रेकरूंना यात्रे दरम्यान कराव्या लागणाऱ्या सर्व धार्मिक विधी बाबत विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले.
या हज प्रशिक्षण शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 500 हज महिला आणि पुरुष यात्रेकरू सहभागी झाले होते.
प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी हज फौंडेशनचे खजानिस हाजी बाबासाहेब शेख,इम्तियाज बागवान, सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाचे ट्रेनर आणि हज फौंडेशनचे सदस्य हाजी इम्तियाज बारगीर,सादत पठाण,हाजी अस्लम मोमीन, बालेचांद म्हालदार,यासीन उस्ताद,हाजी इकबाल देसाई,नूर मुजावर,हाजी युनूस घोरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply