
जोधपूर : जोधपूर मंजूर झाला आहे.काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावर संकट आहे. कारण जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. मात्र जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.सरकारी वकीलांनी सलमानच्या जामीनाला तीव्र विरोध केला आहे. तर जामीन मिळावा यासाठी सलमानचे वकील युक्तीवाद करत आहेत. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, न्यायाधीश जोशी दुपारी २ वा. कोर्टाचा निर्णय देणार आहेत.सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली असून सरकारी वकिलांनी सलमानला जामीन देण्यास तीव्र विरोध केला. जोधपूर न्यायालयात सलमानच्या वकिलांसोबत त्याची बहीण अल्विरा, अंगरक्षक शेरादेखील उपस्थित आहे.जोधपूर न्यायालयाचे वकील रविंद्र जोशी यांची बदली झाल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र बदलीची ऑर्डर अद्याप मिळालेली नसल्यानं न्यायाधीश रवींद्र जोशीच सलमानच्या जामिनाची सुनावणी करत आहेत.काल राजस्थान हायकोर्टाकडून रात्रीतून तब्बल ८७ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या गेल्या. यात जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र जोशी यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी आता सूर्यकुमार पारीख हे नवे न्यायाधीश होणार आहेत.
Leave a Reply