
कोल्हापूर: कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी शरीराचा नेमक्या भागात भूल किंवा बधिरता देणे हे यशस्वीतेसाठी तितकेच कौशल्यपूर्ण काम असते. यासाठी ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक पद्धतीचे अनेस्थेशिया वर्कस्टेशन सुविधा कोल्हापूर नजीकच्या कणेरी मठ यावरील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. मुंबई ते बेंगलोर या भौगोलिक पट्ट्यामध्ये ही आधुनिक सेवा आणि न्यूरो भूलतज्ज्ञ उपलब्ध असणारे सिद्धगिरी हे एकमेव हॉस्पिटल ठरले आहे, अशी माहिती अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के व न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेंदू आणि मणक्याचे अवघड शस्त्रक्रिया हृदयाची शस्त्रक्रिया कॅन्सरच्या गाठी काढण्यासाठी जनरल अनेस्थेशियाची गरज असते. त्यामध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान ४ ते २० तासांचा कालावधी लागतो. यासाठी संपूर्ण शरीराला भूल देतात पण काही वेळेला गरज असते ती चांगल्या व आधुनिक अनेस्थेशिया वर्क स्टेशनची. शस्त्रक्रियेवेळी पेशंटला योग्य प्रमाणात श्वास घेण्यास मदत व्हावी व ऑक्सिजन आणि अनेस्थेशीया गॅसेस योग्य प्रमाण देता यावे यासाठी सुरक्षित शस्त्रक्रिया व्हावी, कमीत कमी प्रदूषण व्हावे यासाठी आधुनिक सामग्रीची गरज असते. ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मशिनरी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेली आहे.मशिनरीची किंमत जरी जास्त असली तरी शस्त्रक्रियेला येणाऱ्या खर्चामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसून पेशंट वर येणाऱ्या धोक्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. आत्तापर्यंत या मशीनद्वारे बाराशे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असणारे पश्चिम महाराष्ट्रातील सिद्धगिरी हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे याचा फायदा रुग्णांना पर्यायाने रुग्णांच्या नातेवाइकांना होणार असून कितीही अवघड स्वरूपाच्या शस्त्रक्रिया आता सहज आणि गुणवत्तापूर्वक होण्यास मदत होणार आहे. तेव्हा समाजातील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो संस्कार विभागाच्या आधुनिक व गुणवत्तापूर्ण सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Leave a Reply