आ.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन

 

कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्त येथील पॅव्हेलिन मैदान बॅडमिंटन हॉल येथे रविवारी कै. प्रकाश मोरे बॅडमिंटन ग्रुपतर्फे या स्पर्धांचे आयोजन केले होते. आमदार सतेज पाटील व महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते स्पर्धेस सुरूवात झाली. यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले दरवर्षी कोल्हापूरात दोन वुडन कोर्ट करण्याचा असल्याचे सांगितले. सध्या कोल्हापूरात बॅडमिंटनची क्रेज वाढत असून महानगरपालीकेच्या मालकीचे बॅडमिंटन कोर्टाचे नुतनीकरण करणे,वुडन कोर्ट बनविणे यासह दरवर्षी किमान दोन सुसज्ज असे बॅडमिंटन कोर्ट बनविण्याचे उदिष्ट आहे. यानुसार चार नवीन कोर्टचे नुतनीकरण सुरू झाले असून खेळाडूंना प्रोत्साहीत करण्याचा मानस असल्याचे मत आ. पाटील यांनी सांगितीले.कसबा बावडा येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतीम सामन्यात तन्मय कोरगावकर व अक्षय मनवाडकर यांच्या जोडीने निनाद अन्यापनावार व मंगेश मोरे यांचा पराभव करुन अजिंक्य ठरले. तिसरा क्रमांक महेश सावंत व मिलींद आपटे यांनी पटकावला.

यावेळी नगरसेवक मोहन सालपे प्रविण केसरकर, सुभाष बुचडे, अशोक जाधव माधुरी लाड, श्रीराम संस्थेचे सभापती मदन जामदार, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, गडहिंग्लज व जयसिंगपूर येथील तब्बल ७५ हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. जम्बल-डबल पध्दतीने स्पर्धा घेण्यात आल्या. दिवसभरात सुमारे ५०हुन अधिक अतितटीचे सामने झाले. अंतीम सामन्यात गेम पॉईंटवर तन्मय व अक्षय यांच्या जोडीने निनाद व मंगेश यांच्यावर मात केली. विजेत्यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देवून गौरवविण्यात आले. 

  विजेत्यांना डी. डी. पाटील, विनायक कारंडे, इंद्रजित कारंडे, किशोर पाटील, श्रीकांत चव्हाण, सचिन पाटील,राजेंद्र रायकर,यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेत पंच म्हणून ॲड. जीवन पाटील, अभिजीत आवळेकर, प्रणव आळवेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा कमिटीचे सुशीलकुमार रणदिवे, श्रीकांत चव्हाण, सचिन यादव, किरण रणदिवे, भास्कर भोसले, मिलींद पाटील, राज नेजदार, यश गुजर, शुभम पाटील, अनिल खुटाळे यांनी नियोजनाचे काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!