
कोल्हापूर ; एन.डी.डी.बी (मृदा),कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व सिस्टीमा कंपनी यांचे संयुक्त सहकार्यातून गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी कार्बन क्रेडीट योजने अंतर्गत ५००० बायोगॅस प्लांट ची उभारणी करण्यात येणार आहे.कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचे मुख्य उद्देश, दूध उत्पादक महिलांना, धुर धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी लावणे या कामातून महिलांना सुटका मिळावी व गॅस सिलेंडरच्या खर्चात बचत व्हावी,स्लरीच्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतीला मिळावे. सरपणासाठी वृक्षतोड होवू न देता नैसर्गिक समतोल राखणेसाठी व जंगले अबाधित राहावीत. परिसरातील हवा स्वच्छ, शुद्ध रहावी व त्याचा चांगला परिणाम दुध उत्पादकांच्या कुटूंबावर होवून त्यांचे आरोग्य चांगले रहावे या हेतूने कार्बन क्रेडीत बायोगॅस योजना गोकुळकडून राबविण्यात येणार आहे अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली
Leave a Reply