
कोल्हापूर :आज दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय कामकाजाच्या प्रश्नावरून एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. सध्या लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन संपन्न झाले आहे. या अधिवेशनात जनतेच्या हिताची अनेक विधेयके पारित करावयाची होती, पण विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध या मुद्यावरून लोकसभेचे व राज्यसभेचे कामकाज एकदिवसही सरळ चालू दिले नाही. त्यामुळे संसदेचे कोट्यावधी रुपयांचे नाहक नुकसान तर झालेच पण देश विकासाचे अनेक निर्णय केवळ विरोधकांच्या गदारोळामुळे होऊ शकले नाहीत. याबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी आणि भारतीय जनतेचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मक्लेश म्हणून एक दिवसाचे उपोषण भारतामध्ये सुरू केले आहे.लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये देशाचा राज्यकारभार करण्यासाठी चर्चा घडणे अत्यंत महत्वाचे असते. कोणताही निर्णय होण्याच्या आधी, त्या निर्णयावर साधक-बाधक चर्चा घडावी यासाठी लोकसभा व राज्यसभा यांचे अधिवेशन भरवले जात असते.
नुकत्याच झालेल्या अधिवेशन सत्रात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू दिलेले नाही. यामुळे संसदेचे अर्थिक नुकसान झालेले आहेच,पण त्या पेक्षाही अनेक महत्वाची विधेयके मंजूरीविना व चर्चेविना आडकून पडली आहेत. या घटनेने व्यथित झाल्यामुळे पंतप्रधानांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. या वाया गेलेल्या कामकाजामुळे मी राज्यसभेत शिवाजीपुलाचा अतिमहत्वाचा प्रश्न सुध्दा मांडू शकलो नाही त्यामुळे मला सुध्दा व्यथा झाली म्हणून मी या उपोषणाला समर्थन देत आहे.भारतीय स्वातंत्र्यानंतर अशी घटना प्रथमच घडत आहे की देशहीतासाठी देशाच्या पंतप्रधानानीच उपोषण धरून आत्मक्लेश करावा..! या उपोषणास माझे स्वत:चे समर्थन आहे
Leave a Reply